शबनम न्यूज | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर महिनाभरापासून तेलंगणात लपून बसला होता. महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) तेलंगणात त्याला अटक करून कोल्हापुरात आणलं. आज पोलिसांनी त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं.
दरम्यान, कोरटकर प्रकरणाची न्यायालयातील सुनावणी संपली असून काही वेळात न्यायमूर्ती निकाल देतील. तत्पूर्वी असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. न्यायालयात नेमकं काय-काय घडलं याबाबत सरोदे यांनी माहिती दिली.
- आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी.
- आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.
- राजमाता जिजाऊंबद्दल त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हा.
- आरोपीने मोबाइल डेटा का डिलीट केला? त्यामागील कारणांचा तपास व्हावा.
- आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील.
- आरोपीला महिन्याभरात कोणी मदत केली याचा तपास गरजेचा आहे.
- आरोपी प्रशांत कोरटकर याने पळून जाण्यासाठी कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा मालक कोण हे समोर यायला हवं.
- आरोपी म्हणाला आहे की तो ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, त्यामुळे आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील.