spot_img
spot_img
spot_img

“इथलं आयटी पार्क हैदराबादला जातंय, आणि आपण फक्त”…अजित पवारांचे खडेबोल!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला. दोन आठवड्यापूर्वीच अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता. त्यादरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या होत्या.त्याची काही प्रमाणात पूर्तता झाली आहे का? अधिकारी तत्परतेने काम करत आहेत का? यासाठी आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी हिंजवडीचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलंच सुनावलं.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीसह पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढलं होतं. मान्सूनच्या आगमनानंतर हिंजवडी आयटी पार्क वॉटर पार्कमध्ये बदलून गेलं होतं. यावरून चांगलंच राजकारण तापलं. आजदेखील अजित पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विविध ठिकाणी पाहणी केली. हिंजवडीच्या क्रोमा चौकातून दौऱ्याला सुरुवात झाली. ठीक सहा वाजता अजित पवार हे हिंजवडीत दाखल झाले. दौऱ्यादरम्यान हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना अजित पवार यांनी सुनावलं.

“धरण करताना मंदिर जातं, तसंच हेही काम महत्त्वाचं आहे. इथलं आयटी पार्क हैदराबाद, बंगळुरुला जातंय, आणि आपण फक्त पाहत राहायचं का?” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या दौऱ्यात अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा झापत, कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. कोणताही राजकीय किंवा स्थानिक दबाव न घेता, ठरलेली कामं पूर्ण करा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा आक्रमक आणि ठाम पवित्रा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!