पिंपरी चिंचवड शहरातील यमुनानगर निगडी या परिसरात प्रसाद दादा कोलते स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. जीवनज्योती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशन व दिव्य दृष्टी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि डॉक्टर चाकणे यांच्यामार्फत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी गरजेनुसार रक्तदाब,मधुमेह, ईसीजी अशा तपासण्या सोबतच हृदयाशी संबंधित असलेल्या अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी, हृदय झडपांची शस्त्रक्रिया,कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग रेडिएशन,केमोथेरपी,मुतखडा व मोफत डायलिसिस सुविधा अशा प्रकारचे उपचार व काही तपासण्या या आरोग्य शिबिरात होणार आहेत. नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी व मनोरंजनाचे कार्यक्रम न करता नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसाद कोलते यांनी हा आरोग्य शिबिराचा विशेष उपक्रम राबवला आहे.
हे आरोग्य शिबिर रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रीडा संकुल यमुनानगर निगडी या ठिकाणी संपन्न होणार आहे.तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक प्रसाद कोलते यांनी केले आहे.