spot_img
spot_img
spot_img

महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाकरिता भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भुसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले.

भिडेवाडा, महात्मा फुलेवाडा येथे भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.

 भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचे पुणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्मारकांचे कामे करतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनाचा विचार करावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच याठिकाणी बसविण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेवून स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

 चंद्रन म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत 119 घरांक (सिटी सर्वे क्रमांक), 624 मालक, 358 भाडेकरु, गलिच्छ वस्ती निर्मूलनाअंतर्गत 36 गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, भुसंपादनाच्या कामे गतीने पूर्ण करण्यात येईल, असेही चंद्रन म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!