शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रियंका प्रवीण बारसे यांच्या वतीने तसेच आदर्श प्राथमिक विद्यालय आयोजित गवळीनगर प्रभागातील दहावी आणि बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी रफिक तांबोळी सर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रियंका प्रवीण बारसे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.
या कार्यक्रमाला भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या अंजली मॅडम, स्त्री रत्न फाउंडेशनच्या उपाध्यक्ष अनुराधा दौंड , प्राथमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका चित्रा औटी मॅडम माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे पालक महिला व पुरुष प्रतिनिधी उपस्थित होते. तांबोळी सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रत्नाकर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.