पिंपरी – चिंचवड : घुसखोरी करून पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना बांगलादेशात परत पाठवले आहे. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चार ने केली आहे. मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख, मोबिन हारून शेख, अब्दुल्ला शागर मुल्ला, जहांगीर बिलाल मुल्ला, मोहम्मद इलाहीन इलियास बिश्वास आणि तोहीद मुस्लेम हसन शेख यांना अटक करून त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी- चिंचवड शहरात घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. ओळख लपवून अनेक जण राहत असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. पंधरा दिवसांपूर्वी भुजबळ चौकातून मुंबईला ५- ६ बांगलादेशी नागरिक जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीम ला मिळाली होती.