spot_img
spot_img
spot_img

शिरूरमध्ये युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिरूर : शिरूर येथील रामलिंग रोडवर १८ वर्षांच्या युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंजली गजानन टिपरे (वय १८, वर्ष, सध्या रा. पोद्दार शाळेजवळ ,रामलिंग रोड , ता. शिरूर ,जि. पुणे. मूळ राहणार बान्सी , ता. पुसद, जि .यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे .

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू रामदास टिपरे (वय ४८ वर्षे, धंदा-वीटभट्टी मजुरी, सध्या रा. पोद्दार शाळेजवळ रामलिंग रोड शिरूर, जि .पुणे मुळ रा. बान्सी ता. पुसद , जि .यवतमाळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

२४ मार्च रोजी पहाटे ३ वाजता राजू टिपरे हे वीटभट्टी येथे कामास गेले होते. त्यावेळी पुतणी अंजली ही देखील त्यांच्या सोबत आली होती. त्यानंतर सकाळी पावणेदहाचा सुमारास तिने त्यांना कामाच्या ठिकाणी चहा करून आणून दिला व ती घरी निघून गेली. सकाळी साडेदहा सुमारास राजू यांची मुलगी वीटभट्टीवर आली. अंजलीने घराचा दरवाजा बंद केला असून, ती घराचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यावेळी राजू व त्यांची पत्नी शीतल यांनी घरी जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा बंद होता. त्यावेळी अंजली हिला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता ती आतून प्रतिसाद देत नसल्याने राजू यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला. त्यानंतर अंजलीने ओढणीने गळफास करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

उपचारासाठी तिला तिला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मरण पावल्याचे घोषित केले. याबाबतचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!