spot_img
spot_img
spot_img

सरस्वती माध्यमिक विद्यालय शाळेत बालविज्ञान व पर्यावरण मंडळ अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन

निगडी: विज्ञान म्हणजे कार्यकारणभाव समजून घेणे.कोणत्याही गोष्टीमागे काही ना काही कारण असते,ते समजून घेण्याचे शास्त्र म्हणजेच विज्ञान.दैंनदिन जीवनात नाना घटना घडत असतात,पण त्या का घडतात?हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा…तेव्हा आपल्याला नेमके कारण समजेल.म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागचे कारण समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन वाटचाल करणे गरजेचे आहे.समाजात नाना चमत्कार करून लोकांना फसविणारे अनेक बाबा पहायला भेटतात.पैशाचा पाऊस पाडणारेच बाबा लोक त्यांच्या कार्यक्रमाचे पैसे मागतात हे ही साधे आपल्याला समजून घेता येत नाही.अशा विचित्र गोष्टींचे बळी आपण ठरतो असे विचार आपल्या व्याख्यानातून उत्तम जोगदंड,दिगंबर कट्यारे यांनी व्यक्त केले.याचसाठी प्रशालेत “चमत्कारमागील विज्ञान समजून घेणे”…या विषयाचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर त्याच्यामागचे विज्ञान समजून सांगण्यात आले,विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.यासाठी मा.दिगंबर कट्यारे(कार्यवाह,वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प,महाराष्ट्र अंनिस),उत्तम जोगदंड(कार्यकारी संपादक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका),क्रांती पोतदार(अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य),गणेश तामचिकर(अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य)यांनी मोलाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह करून दाखविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वांगेकर,निवेदन व आभार प्रतिमा काळे तर विशेष सहकार्य कैलास कोशिरे,सुकन्या जाधव यांनी केले.कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा.गोविंदजी दाभाडे सरांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!