spot_img
spot_img
spot_img

रहाटणीतील प्राथमिक शाळेला नवीन इमारत बांधावी, देविदास तांबे यांची मागणी

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांना दिले निवेदन

पिंपरी चिंचवड : रहाटणी मधील प्रभाग क्रमांक 27 मधील असलेल्या महानगरपालिका वतीने चालविण्यात येणारी प्राथमिक शाळा या शाळेच्या करिता नवीन इमारत बांधावी अशी मागणी माजी सरपंच श्री. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ आप्पा तांबे यांनी केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे सदर मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

आपल्या निवेदनात देविदास तांबे यांनी नमूद केले आहे की, रहाटणी परिसरा मध्ये महानगरपालिकेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेला नवीन इमारतीची गरज आहे. सध्याच्या शाळेची इमारत ही दोन मजली आहे परंतु या शाळेच्या इमारतीला 35, 40 वर्षे झाली आहेत, या शाळेत जवळपास अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग उपलब्ध नाही या शाळेला नढे कुटुंबांनी विना मोबदला जागा दान केली तसेच त्या शाळेच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. या ठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणात होत असते, भविष्यात ही जागा कमी पडणार आहे.

सदर शाळे करिता सर्वे नंबर 44 मध्ये जी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी नवीन इमारत करावी व जुन्या शाळेच्या ठिकाणी त्या शाळेचे मैदान करावे अशी मागणी देविदास तांबे यांनी केली आहे.

तसेच शिवजयंतीच्या वेळी आयोजित कार्यक्रमांना भविष्यकाळात जागा कमी पडणार नाही मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा होईल व शाळेलाही मैदान उपलब्ध होईल त्यामुळे लवकरात लवकर शाळेची नवीन इमारत बांधावी अशी मागणी देविदास तांबे यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!