spot_img
spot_img
spot_img

ओतूर येथे सहा वर्षाचा बिबट्या जेरबंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात असलेल्या बाबीत मळा येथे पाच ते सहा वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात सोमवारी (दि.२४ मार्च) रोजी पहाटे ४.३० वा. सुमारास वनविभागाला यश मिळाले आहे.

ओतूर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे ,ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता , त्यानुसार सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास तुकाराम गीते यांचे भ्रमणध्वनीवरून वन विभागाला बिबट्या जेरबंद झाला आहे अशी माहिती समजताच तात्काळ वनपाल ओतूर सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे मोहिनी वाघचौरे तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, फुलचंद खंडागळे,रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांना देण्यात आली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी,आपदा मित्र वैभव अस्वार, विराज अस्वार, तसेच ग्रामस्थ तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते, विकास गीते, कुणाल गीते, पोपट मालकर, प्रदीप तांबे, सुनील मोरे यांचे मदतीने बिबट्यास रेस्क्यू करून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!