शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या निगडी चौक येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,क्षेत्रीय अधिकारी निवेदीता गार्गे,अतुल पाटील,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे,सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे आदी उपस्थित होते.
” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ” अशी गर्जना करून इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील असंतोषाचे जनक होते. लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा दिली, सडेतोड भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी केलेला संघर्ष तरुण पिढीसाठी प्रेरणादायी होता.