पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात सिगरेट व गुटखा विक्री थांबवावी अशी मागणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष देविदास म्हात्रे यांनी केली आहे
संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना संतोष देविदास म्हात्रे यांनी निवेदन दिले आहे संत तुकाराम नगर परिसरातील अनेक ठिकाणी अनेक दिवसापासून सिगरेट गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री खुलेआम होत आहे.
संत तुकाराम नगर परिसरात भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाय सी एम हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल या परिसरात विद्यार्थी ,रुग्ण ,महिला व नागरिक मोठ्या संख्येने असतात या ठिकाणी व्यसनजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे वही समाजासाठी अत्यंत घातक असल्याने या सिगरेट व तंबाखू गुटखा विक्रीवर बंदी आणावी अशा पदार्थांची विक्री थांबवावी अशी मागणी संतोष देविदास म्हात्रे यांनी केली आहे. शैक्षणिक संस्था व रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात सिगरेट व गुटखा विक्री सक्त मनाई आहे त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गुन्हेगारी कारवाई केली जाते तसेच आरोग्याला अपायकारक पदार्थ असल्याने सदर विक्री थांबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतोष देविदास म्हात्रे यांनी केली आहे.