spot_img
spot_img
spot_img

PCMC| दिघी रोड गंगोत्री पार्क येथे जड वाहनांना बंदी असा सूचना फलक लावा.. मा.नगरसेविका प्रियंका बारसे यांची मागणी

पिंपरी चिंचवड :

पिंपरी चिंचवड शहरातील दिघी रोड परिसरात गेली चार-पाच महिन्यापासून रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे, या रस्त्यावर जड वाहनांना बंदी असा सूचना फलक लावा अशी मागणी या भागातील माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ई प्रभाग स्थापत्य विभागाला प्रियांका ताई बारसे यांनी निवेदन केले आहे. सदर निवेदनात प्रियांका ताई बारसे यांनी नमूद केले आहे की गेली चार-पाच महिन्यापासून गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी येथे ड्रेनेजवर रस्ता काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्याची सूचना संत निरंकारी भवन व हरी ओम स्वीट , दिघी रोड भोसरीजवळ जड वाहनांना बंदी असे सूचनाफलक दोन्ही कोपऱ्यांवर लावणे आवश्यक आहे. काम सुरू असल्याने जड वाहनांना पुढे जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. जड वाहनांना पुढे जाण्यास रस्ता नाही हे समजल्यावर गाड्या माघारी वळतेवेळी येथे ट्राफिक एक दीड तासासाठी जाम होते. या रस्त्यावर शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या स्कूलबस वाहतुकीत अडकल्यामुळे त्यांना घरी जाण्यास ही उशीर होत आहे. तसेच कामगार वर्ग, महिला रुग्ण, जेष्ठ नागरिक यांना याबाबतचा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत अनेक वेळा तोंडी सूचना दिल्या होत्या परंतु दखल घेतली गेली नाही तरी सदर रस्ता कॉँक्रेटीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी जड वाहनांना बंदी असे सूचनाफलक त्वरित लावण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी केली आहे तसेच सदर कामाचा वेग वाढवावा व लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणीही माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!