spot_img
spot_img
spot_img

LadakiBahinYojana : राज्यातील आणखी ८० हजार लाडक्या बहिणी अपात्र!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिऐणींना धक्के बसत आहेत. राज्य सरकारने आणखी ८० हजारांहून अधिक लाडक्या बहिऐणींना अपात्र ठरविले आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी – केली जात आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

जालना जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या ४ लाख ८४ हजार ६९४ इतकी झाली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातही लाडक्या बहिणींना फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी साधारण ३० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे. नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!