spot_img
spot_img
spot_img

यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त – अमितेश कुमार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त राहील. पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मागील वर्षीची परवानगी चालेल. यावर्षी परवानगीची वेगळी गरज नाही, असे स्पष्ट करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांना माेठा दिलासा दिला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे होते. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी पार पडला. या प्रसंगी पोलिस आयुक्त अमितेश कुमार बाेलत हाेते.

यावेळी मंचावर डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!