spot_img
spot_img
spot_img

PUNE : अमली पदार्थांची विक्री करणारे जेरबंद!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अमली पदार्थ विरोधी पथक १, कोंढवा पोलिस आणि सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्त कामगिरी करत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. अभिनव प्रदीप गुप्ता (२२, रा. लक्ष्मण पार्वती सोसायटी, शिवणे) आणि इरशाद इफतीकार शेख (२७, रा. पारगेनगर, कोंढवा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी ८ लाख ५८ हजार ८२० रुपयांचे अमली पदार्थ व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस, मिलिटरी इंटेलिजन्सला शुक्रवारी (दि. १८) पेट्रोलिंग करत असताना गगन एव्हेन्यू बिल्डिंगजवळ, कोंढवा येथे एका ग्रे रंगाच्या कारमध्ये रेकॉर्डवरील आरोपी अभिनव गुप्ता हा त्याच्या एका साथीदारासह संशयास्पदरीत्या बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जात, त्यांच्याकडे विचारपूस केली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गुप्ताच्या ताब्यातून ८२ हजार ८०० रुपये किमतीचा ८ ग्रॅम २८ मिलीग्रॅम ओझी कुश (हायड्रोपोनिक) गांजा, ८२० रुपये किमतीचा बिया-बोंडासह गांजा आणि एक मोबाइल आढळून आला. तसेच, इरशाद शेख याच्याकडे २ लाख ४ हजार २०० रुपयांचे १० ग्रॅम २१ मिलीग्रॅम एमडी, ५ लाख रुपयांची कार, दोन मोबाइल, एक इलेक्ट्रिक वजन काटा असा दोघांकडील ८ लाख ५८ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!