शबनम न्यूज | प्रतिनिधी
कंपनी प्रशासनाने कामावरून कमी केल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याच जुन्या सहकाऱ्याकडे खंडणीची मागणी करत धमकी दिल्याचे उघड झाले आहे. आरोपीने पैशांची मागणी करत त्रास दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कंपनीत कामावर येत असताना, पूर्वी याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपीने त्यांचा पाठलाग केला. कंपनीने आपल्याविरोधात मिळालेल्या तक्रारींमुळे कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून, आरोपीने फिर्यादी यांना धमकावले.‘तू मला कामावरून काढून टाकले आहे, आता तू पगाराएवढे पैसे दर महिन्याला द्यायचे, नाहीतर तुलाही काम करू देणार नाही आणि तुझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करीन’ अशी धमकी देत पैशांची मागणी केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.