spot_img
spot_img
spot_img

‘सैयारा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद!

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शुक्रवारी (१८ जुलै) रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी पाहिल्यानंतर समजतं.अहान पांडे व अनित पड्डा यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामधून हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहेत. परंतु, असं असतानाही प्रेक्षकांमध्ये त्यांची चर्चा असल्याचं पाहायला मिळतं.

‘सैयारा’ चित्रपटाची तरुणांमध्ये विशेष क्रेझ असल्याची दिसते. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अहान पांडे व अनित पड्डा हे कलाकार यामुळे विशेष चर्चेत आले. सोशल मीडियावरही अनेक जण ‘सैयारा’चं कौतुक करताना दिसतायत.

क्रिश कपूर (अहान पांडे) एक तापट स्वभावाचा म्युझिशियन आणि वाणी (अनित पड्डा) जिला एक पत्रकार व्हायचं असतं. काही विचित्र घटनांमुळे या दोघांची भेट होते. अशी ‘सैयारा’ चित्रपटाची कथा असल्याचं म्हटलं जात आहे.रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट ४० ते ६० कोटींच्यादरम्यान असल्याचे म्हटले जात आहे आणि आठवड्याच्या शेवटी चित्रपट सहजपणे हा आकडा गाठू शकतो. ‘सैयारा’ने फक्त दोन दिवसांतच त्याचे बजेट वसूल केले. बॉलीवूड चित्रपटाने रिलीजच्या फक्त दोन दिवसांतच त्याचे बजेट वसूल केले असे क्वचितच घडले असेल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!