spot_img
spot_img
spot_img

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

महात्माफुले नगर चिंचवड पुणे येथे कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन चिंचवड पुणे आयोजित श्रीमद् भागवत कथा-ज्ञानयज्ञ- सप्ताह सोहळा दि. १७ मार्च २०२५ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात कथा निरुपण धर्माचार्य डॉक्टर हभप शंकर महाराज शेवाळे यांनी केले. या निरुपणाचे एक वैशिष्ट्य असे की भागवतात ‘ज्ञान- मक्ती-वैराग्य यांचा त्रिवेणी संगम आहे. तसेच “ज्ञान” या शब्दाचा परंपरेने ‘अध्यात्मिक ज्ञान’ असाच अर्थ घेतला जातो. पण याचबरोबर ऐहिक ज्ञान / भौतिक ज्ञान हाही अर्थ यात अभिप्रेत आहे.

भागवतात अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच ऐहिक ज्ञान विपुल प्रमाणात आहे, विशेष म्हणजे विविध ज्ञानशाखांमधील हे ज्ञान आहे हे सर्वांसमोर येऊन त्यात अधिक संशोधन व्हायला हवे या विचाराने त्यांनी येथे निरुपण केले. ‘भगवान श्रीकृष्ण भक्ती’ हा तर भागवताचा आत्मा आहे तसेच ऐहिक ज्ञान हा प्राण आहे असे मत त्यांनी या निरुपणातून आवर्जून मांडले.

सदर सोहळा पार पाडण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व परिसरातील अनेक सामाजिक संस्था, माता_भगिनी व बंधू यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!