शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक थेंब रक्ताचा, वाचवेल जीव मोलाचा’, ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’, या शीर्षकांतर्गत हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.
पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव व इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशा दिनेश यादव यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनात सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे. सदर रक्तदान शिबिर मंगळवार दि. 22 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कुदळवाडी, यादव नगर ,चिखली येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजे दरम्यान संपन्न होत आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.