-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘रक्तदाता व्हा, जीवन वाचवा’ तसेच महा रक्तदान संकल्प या शीर्षका अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपले रक्तदान करावे, असे आवाहन उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले आहे.
सदर रक्तदान शिबिर मंगळवार (दि. २२) जुलै रोजी राजमाता जिजामाता सांस्कृतिक भवन, मोहन नगर काळभोर नगर ,चिंचवड येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत संपन्न होत आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.