- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या वतीने ‘महा रक्तदान संकल्प’ या शीर्षकांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर मंगळवार (दि. २२) जुलै रोजी विदर्भ संयोग मंडल, सेक्टर नंबर २५ , निगडी प्राधिकरण येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत संपन्न होत आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपले रक्तदान करावे, असे आवाहन आमदार उमा खापरे यांनी केले आहे.