spot_img
spot_img
spot_img

शहरात परतीच्या प्रवासाला निघालेल्या वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. दरम्यान छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत समर्थ भारत, सक्षम भारत अभियान वैद्यकीय विभाग आयोजित व अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून वारकरी आरोग्यसेवा व चरण सेवेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष याचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे व पुणे जिल्हा समन्वयक अमित जागडे यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे समर्थ भारत सक्षम भारत वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ योगेश पिंगळे, औद्योगिक विभाग प्रमुख सौ दीपावली गायकवाड मॅडम, शिक्षण विभाग प्रमुख प्रा. हेमंत राजस्था सामाजिक कार्यकर्ते किशोर पाचपुते, शशिकांत नाकडे, डॉ वितराग संचेती, डॉ सुयोग पाखरे, डॉ. प्रणव पाटील, समर्थ भारत प्रमुख गौरव वाळुंजकर तसेच अनुलोम चे पिंपरी भाग जनसेवक श्री राजकुमार जाधव, भोसरी भाग जनसेवक पै. अक्षय गावडे व मिलिंद पाटील, श्रीधर मानकर, राजू चौधरी, नियती खराडे, यांसह 14 अनुलोम मित्र उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील या संस्थेमधील संपूर्ण डॉक्टरांची टीम या ठिकाणी चरण सेवा साठी उपस्थित होती. या ठिकाणी जवळपास सर्व वारकऱ्यांनी चरण सेवेचा लाभ घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!