spot_img
spot_img
spot_img

नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे २२ जुलै ते ३० जुलै दरम्यान वाढदिवस जनविश्वास सप्ताह साजरे करण्याचे ठरविले असुन त्या धोरणानुसार मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे म्हणून  नागरिकांना रक्तदान म्हणजे जीवन दान आहे.आपण रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.अशा प्रकारचे आयोजकांकडून आवाहन करून  रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी  विनंती करण्यात आली. चिचवड मतदार संघात विविध ठिकाणी फलक लावून सोशल मिडीया व विविध समाज माध्यम मार्फत रक्तदात्यांना या शिबिराची माहिती देण्यात आली होती.

रक्तदान शिबिराची वेळ सकाळी १० ते दु ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली होती.यावेळी ८३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जनसेवा रक्तपेढी व संजीवनी रक्तपेढी या  संस्थेमार्फत रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे,राष्ट्रवादी कॅीग्रेस पक्षाचे ओबीसी सेल चे अध्यक्ष सतिशदादा दरेकर, मा. नगरसेवक खंडुशेठ कोकणे, संतोष कोकणे, विनोद नढे, नगरसेविका उषामाई काळे, दिलीप आप्पा काळे,कैलासबाबा बारणे, राजेद्र साळुखें,, प्रशांत सपकाळ, शाम जगताप, तानाजी जवळकर, शरद बारणे , विशाल पवार, गोरक्षनाथ पाषाणकर, विशाल बारणे , प्रमोद शिदे , भरत बारणे,  महाराष्ट्र राज्य अनुसुचीत जाती जमाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य राजेद्र जगदाळे,  चिचंवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीताताई कोकणे,उपाध्यक्षा अश्विनीताई चंद्रकांत तापकीर , पैलवान अजय कदम,गणेश नखाते, काळुराम कवितके, राजेद्र पवार, सुनिल गोडांबे, मोहनशेठ नखाते, माऊली जाधव, माऊली हांडे, माऊली काटे, पोपट जगताप, प्रमोद काटे, शंकर काटे, नंदकुमार काटे, विलास काटे, अनिल काटे, जगन्नाथ काटे, मच्छिद्र काटे, तसेच मा.स्वीकृत सदस्य सागर कोकणे  ,युवानेते उमेश काटे, चंद्रकांत तापकीर,सुमित डोळस यांनी शिबिराची जबाबदारी  पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!