माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बु आसवानी यांच्या वतीने सामाजिक उपक्रम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विशेष आधार कार्ड नोंदणी अभियान हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बु आसवानी यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते या शहरात महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून नागरिक वास्तव्य आहेत या सर्व नागरिकांसाठी आपले आधार कार्ड दुरुस्ती करणे तसेच नवीन आधार कार्डची नोंदणी करणे आधार अपडेट करणे, आधार व मोबाईल नंबर लिंक करणे यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील कित्येक स्थानिक नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढता येत नसल्याने व पुरेशी माहिती नसल्याने आधार दुरुस्ती प्रलंबित राहते, आजच्या धगधगीच्या जीवनात व बरेचदा अपूर्ण ज्ञानामुळे व आधार सेंटर कोठे आहे? त्याची वेळ काय असते? तसेच आधार सेंटरवर प्रचंड गर्दी असल्यामुळे व मर्यादितच आधार नोंदणी व दुरुस्ती होत असल्याने पिंपरी प्रभाग क्रमांक 21 व 19 मध्ये मंगळवार दिनांक 22 जुलै व 23 जुलै व शुक्रवार दिनांक 25 जुलै व 26 जुलै या दिवशी सकाळी 11 ते सहा या वेळेत हे विशेष आधार कार्ड नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी केले आहे.
तसेच या अभियानात सहभागी होण्यासाठी व या अभियानाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधावे 87 88 79 58 54 व 96 89 84 61 83 या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.