spot_img
spot_img
spot_img

शहरात महापालिकेच्या वतीने पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळी ५.२० वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांस पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे,माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे,माजी नगरसदस्य संदीप वाघेरे,दत्तात्रय वाघेरे,माजी नगरसदस्या उषा वाघेरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता बी.एस.रोकडे, उद्यान निरिक्षक प्रकाश ताकवले तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!