- अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभियानाचे आयोजन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम, अभियानाचे आयोजन करीत अजित पवार यांचे वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तथा संकल्प सोशल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती बापू कातळे यांनी दिली.
या मोफत आधार कार्ड अभियाना अंतर्गत नवीन आधार कार्ड नोंदणी, एक ते पाच वयोगटातील नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्ड दुरुस्त करणे, सदर कामे रविवार (दि. २०) जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगीता अपार्टमेंट समोर, दांगट वस्ती, विकास नगर येथे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोफत आधार कार्ड अभियानाचा लाभ घेण्याकरिता प्रसाद राऊत व मनीष गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बापू कातळे यांनी केले आहे. तसेच या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील बापू कातळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.