शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे ( 5 जून) औचित्य साधून एक पेड माँ के नाम ही योजना सुरू करण्यात आली. सध्या पर्यावरणीय प्रदूषण व जागतिक तापमानवाढ यासारख्या समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. म्हणून शासनाने या योजनेअंतर्गत 5 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. एक पेड माँ के नाम ही एक सामाजिक मोहीम आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावण्यास प्रोत्साहित करते. या मोहिमेमुळे आपण आपल्या आईच्या प्रति आदर व्यक्त करतोच शिवाय पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही पार पाडतो.
बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये संस्थेचे सचिव सन्माननीय एल.एस.कांबळे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या समारंभासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. मारुती जाधव, श्री. धनंजय जाधव, शाळेचे माजी सहशिक्षक श्री. विकास मस्के, श्री ओव्हाळ त्याचप्रमाणे विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे पालक ( आई ) तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाबाजी शिंदे सर आवर्जून उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थी, अनेक विद्यार्थ्यांच्या आई यांच्याही हस्ते विद्यालयामध्ये व विद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, पूनम तारख, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, योगिता होनमाने, जयश्री महानवर, आनंद गोंदील, प्रमोद रायकर, अमोल सूर्यवंशी, धुडकू कुवर, संदीप दीक्षित,स्वप्निल पठारे यांनी परिश्रम घेतले..