spot_img
spot_img
spot_img

शहर राष्ट्रवादी वतीने बेरोजगारांना स्वयंसिद्ध होण्याची सुवर्णसंधी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राज्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर परिसरातील तरुण तरुणींना स्वयंसिद्ध होण्यासाठी शहरात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि आजी माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बेरोजगांरासाठी रोजगार महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे योगेश बहल यांनी दिली.

संत तुकारामनगर, पिंपरी येथील भारतीय जैन संघटना स्कूल, वाई.सी.एम. हॉस्पिटल समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड, पुणे ४११०१८ येथे रविवार, दि.२० जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत या वेळेत नोकरी महोत्सव असणार आहे. अधिक माहितीसाठी 9657580620/ 9579683268 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

बेरोजगारांनी नोकरीच्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन संधीचे सोने करावे : योगेश बहल

योगेश बहल म्हणाले की, राज्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगनगरीतील युवक युवती व बेरोजगारांना नोकरी संधी या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही निर्माण केली आहे. यामध्ये नामांकीत ५० कंपन्या एकाच छताखाली लावण्यात येतील. त्यातून फार्मा एफएमसीजी, बँकींग, आयटी, रिअल इस्टेट, इन्शुरन्स, ॲग्रीटेक, हेल्थकेअर अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. इयत्ता ५ वी ते सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्रीधारक उमेदवारांनी ncp.jobfairindia.in या संकेतस्थळावर तसेच आम्ही जाहिरातीत दिलेल्या बार कोड स्कॅन करून आपली नोंदणी तसेच पात्रतेनुसार अर्ज करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आलेल्या या सुवर्ण संधीचा सर्व बेरोजगारांनी लाभ घेऊन संधीचे सोने करावे असे आवाहन करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!