spot_img
spot_img
spot_img

अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालावी ; स्वराज्य पक्षाची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने चिखली पोलीस स्टेशन येथे मोरेवस्ती परिसरातील हातभट्टी दारू व अनधिकृत हॉटेलमधून चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

मोरेवस्ती परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध दारू विक्री ही युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारी ठरत आहे तसेच परिसरातील महिलांना व कुटुंबांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तत्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

8 दिवसायच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर स्वराज्य पक्षाच्या वतीने तोडफोड करण्यात येईल आणी याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल. या प्रसंगी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे,
विद्याताई शेवाळे, पूनम मॅडम महाडिक, प्रतिभाताई काळे, योगेश सोनावणे, समाधान जाधव, सचिन शिंदे, किशोर तेलंग, स्वप्नील शेंडगे, रंगनाथ भंडारी,यश कारले, सागर शेंडगे यांची उपस्थिती होती.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!