शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेरोजगार युवकांना या निमित्ताने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरुण वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या संधी नेहमी शोधत असतो, रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही, तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. या बेरोजगारीच्या समस्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर नोकरी महोत्सव इयत्ता पाचवी ते पदवीधर यांच्यासाठी भारतीय जैन संघटना स्कूल वाय सी एम हॉस्पिटल समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड येथे रविवार (दि. २०) जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होत आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांनी या नोकरी महोत्सवात सहभाग घेऊन मिळत असलेली रोजगाराची संधी सोडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल व राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केले आहे.
या नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.