spot_img
spot_img
spot_img

PCMC : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल बुधा ढवळा दाभाडे यांनी महापालिकेत कायमस्वरुपी नोकरी देतो म्हणून तब्बल १२ लाख रुपये घेत आर्थिक फसवणूक केली. त्या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी भांडारपाल दाभाडे यांना नोटीस बजावली आहे. तसेच तीन दिवसात लेखी खुलासा मागितला आहे.

भांडारपाल दाभाडे यांच्या विरोधात नोकरी लावतो म्हणून १२ लाख रूपये घेऊन आर्थिक फसवणुकीची तक्रार निगार दस्तगीर आतार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, मूळ शैक्षणिक कागदपत्रेही घेऊन ती परत केली नाहीत.

ही बाब अत्यंत गंभीर असून, कार्यालयीन शिस्तीचा व नियमाचा भंग करणारी आहे. या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम तीनचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरवर्तन प्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ५६ व महाराष्ट्र शिस्तभंग विषयक कारवाई का करण्यात येवू नये म्हणून दाभाडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!