शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्य परीक्षा परिषद घेत असलेल्या महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ परीक्षेचा (टेट) निकाल तयार आहे. २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या डी.एड, बी.एड उमेदवारांचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता टेट परीक्षेचा निकालही लांबणीवर पडला आहे.
उमेदवारांनी मुदतीमध्ये अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, बी. एड आणि डी. एड.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षेसाठी संधी दिली आहे. आता या विद्यार्थ्यांमुळेच ऑनलाईन परीक्षा घेऊनही निकाल लांबणीवर पडला आहे.
यंदा बी. एड., डी. एड. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षेसाठी बसण्याची संधी दिली होती. अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही. मुदतीत गुणपत्रक, प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित नुकसानीस उमेदवारालाच जबाबदार धरण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.