spot_img
spot_img
spot_img

DEHU : बेकायदेशीर नळजोड घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देहू नगरपंचायत परिसरात सार्वजनिक नळ कोंडाळ्यातून घेतलेले बेकायदेशीर व अनधिकृत नळजोडची तपासणी करून त्यांवर दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

गायरान जमिनीवर वास्तव्य असणाऱ्या नागरिकांसाठी नगरपंचायत प्रशासनाकडून सुमारे २० सार्वजनिक नळकोंडाळे दिले होते. त्यातील अनेक नळकोंडाळ्यांवर तेथील नागरिकांनी बेकायदेशीर ताबा मारत घरामध्ये नळजोड घेतले आहेत तर अनेकांनी सार्वजनिक नळ कोंडाळ्याच्या पाइपलाच ठिकठिकाणी जोडून नळ जोड घरात घेतले आहेत. तर अनेक ठिकाणी शासकीय जलवाहिन्यातून अनधिकृत
नळजोड घेतले आहेत.

वसुली पथक फिरत असताना असे अनेक नळजोड धारक आढळून आले आहेत त्यामुळे अशा बेकायदेशीर व अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांवर दंडात्मक अथवा फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. याबाबत आता प्रशासनाने कडक धोरण हाती घेतले असून लवकरच कारवाई सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!