शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष तसेच संकल्प सोशल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या वतीने आधार कार्ड अपडेट तसेच स्मार्ट मतदान कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड, स्मार्ट आधार कार्ड मिळविण्याकरिता सर्व सुविधा प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बापू कातळे यांनी दिली आहे.
सदर सर्व सुविधा मोफत असून बापू कातळे यांचे जनसंपर्क कार्यालय, विकास नगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रभागातील नागरिकांसाठी मोफत सर्व सुविधा देण्यात आले आहेत. यामध्ये महत्त्वाचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तसेच रेशन कार्ड देखील ऑनलाइन असणे आवश्यक आहे.
या सर्व सुविधा उपलब्ध असून प्रभागातील नागरिकांचे स्मार्ट मतदान कार्ड, स्मार्ट आधार कार्ड तसेच स्मार्ट रेशन कार्ड मिळविण्याकरिता बापू दिनकर कातळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट द्यावी तसेच या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बापू कातळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.