spot_img
spot_img
spot_img

Education : मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता महाडीबीटी प्रणालीवरून नवीन तसेच नुतनीकरण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची ऑनलाईन स्वीकृती १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे. मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी नोंदणीकृत अर्ज तत्काळ ऑनलाईन मंजूर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रवीकिरण पाटील यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे, नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी नूतनीकरण झालेल्या अर्जांचे प्रमाण नवीन अर्जांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी प्रथम प्राधान्याने नूतनीकरण अर्जांची पडताळणी करून ते ऑनलाईन मंजूर करावेत व मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.

त्याचबरोबर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!