spot_img
spot_img
spot_img

कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 11 कृष्णा नगर मधील स्पाईन रोडवर धोकादायकी खड्डे, उघडलेले रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला त्यातच पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे, तसेच खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे, या अनुषंगाने कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

हे खड्डे मोठे आणि खोल असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांमुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, “खड्ड्यांमुळे गाडी चालवणे खूप कठीण झाले आहे. कधीही अपघात होण्याची भीती वाटते.” एका नागरिकांनी सांगितले की, “खड्ड्यांमुळे माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे.”

नागरिकांनी अनेकवेळा या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे, अनेक वेळा जनसंवाद मध्ये देखील याची तक्रार करण्यात आली होती परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा तसेच, भविष्यात खड्डे पडू नयेत यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!