शबनम न्यूज , प्रतिनिधी :
कुणाल कामराचे स्टँड अप कॉमेडी कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी युवासेना वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन युवासेना वतीने अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याकडे देण्यात आले आहे. युवा सेना वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बद्दल कुणाल कामरा या विकृत व्यक्तीने स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली आक्षेपार्ह वक्तव्य केले असुन त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. तसेच स्टँडअप कॉमेडी या कार्यक्रमावर देखील बंदी घालण्यात यावी कारण या कार्यक्रमामध्ये अश्लील भाषेचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्राची प्रतीमा मलीन होत आहे.
आज युवासेनेच्या वतीने तसेच शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या आदेशाने युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड यांनी व युवासेना भोसरी विधानसभा प्रमुख आशिष जगधाने,युवासेना उपशहरप्रमुख दत्ता औराळे,उपशहरप्रमुख रोहीत जगताप,शिवसेना विभागप्रमुख श्रीकांत सुतार, संजय ससाणे,मंगेश कसबे यांनी अप्पर पोलीस आयुक्त वसंतजी परदेशी यांना भेटुन कुणाल कामरा याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.असे निवेदन देण्यात आले.