शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : ‘हुतात्मा दिनाचे’ औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सकाळी १०:०० ते २:३०च्या दरम्यान जवळपास ७५ रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
गेली २७ वर्षांपासून दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव असलेली ‘गडकिल्ले सेवा संस्था’२३मार्च हा ‘हुतात्मा दिन म्हणून कृतज्ञता दिवस पाळत आली आहे.
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी जवळपास १५० ज्ञात आणि अज्ञात क्रांतीकारकांचा वास्तव इतिहास जगापुढे आणला.या क्रांतीकारकांच्या प्राणांतिक संघर्षामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत हे विसरून चालणार नाही.
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी २३मार्च हा ‘हुतात्मा दिन’म्हणून ओळखला जावा यासाठी १९९५पासून महाराष्ट्रभर साजरा करण्यास सुरूवात केली.या दिवशी स्वातंत्र्यासाठी फासावर चढलेल्या वीर, हुतात्मा भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू या थोर क्रांतीकारकांची आठवण ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीस त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व ओळखून दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर हयातभर कार्यरत राहिले.
त्यांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेले कार्य अविरत सुरू रहावे या करिता गडकिल्ले सेवा संस्थेचे सर्व शिलेदार आजही निष्ठेने त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत.
या दिवशी संस्थेशी महाराष्ट्रभर जोडले गेलेले शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रभर ‘हुतात्मा दिना ‘ निमित्त ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या विषयावर व्याख्यानांचे व क्रांतीकारकांचे चरीत्र तथा त्यांचे माहितीपर प्रदर्शने आयोजन करत आहेत.पुणे जिल्ह्यात पुणे शहर,सातारा शहर, कोल्हापूर,ठाणे शहर,पिंपरी, चिंचवड,दिघी,राजगुरूनगर येथे विविध उपक्रम आयोजित करत आहे तर विदर्भात अमरावती,मराठवाड्यात धाराशीव येथे देखिल विविध उपक्रमांद्वारे क्रांतीकारकांना आदरांजली वाहत असतात.
गड किल्ले सेवा संस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या सहकार्याने क्रांतीकारकांच्या विषयावर ‘स्वातंत्र्य संग्रामातील समिधा’ हे दुर्गमहर्षींनी संकलित केलेले भव्य प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने फुरसुंगी,पुणे येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी लावण्यात आले होते. या प्रदर्शनास परिसरातील विविध माध्य.विद्यालय आणी परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.सुमारे ६०० विद्यार्थ्यांसह जवळपास ९०० नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपला अभिप्राय नोंदविला.
आज २३ मार्च २०२५ रोजी मोरया गोसावी क्रिडासंकुलातील संस्थेच्या पु.ल.देशपांडे ग्रंथालयाच्या आवारात चिंचवडगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०:०० ते दुपारी २:३०या वेळेत हे शिबिर आयोजित केले गेले.रक्तदान शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.नगरसेवक राजेंद्र गावडे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मा.श्री विजयजी पारगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे श्री संतोष घुले यांनी प्रस्तावीत केले.अॅड.अजय सोनवणे यांनी ‘२३ मार्च हुतात्मा दिन’ संकल्पना विषद केली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मा.नगरसेवक श्री राजेन्द्र गावडे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मा. श्री विजय पारगे यांनी मनोगते व्यक्त केली.विरगळ अभ्यासक श्री अनिल दुधाणे यांनी पाहुण्यांचे शिवप्रतिमा देऊन आभार व्यक्त केले.संस्थेच्यावतीने कार्यअध्यक्ष श्री ब.ही.चिंचवडे व उपाध्यक्ष श्रीहरी तापकीर यांनी रक्तदात्यांना रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र वितरित केली.गड किल्ले सेवा संस्थेंचे शिलेदार श्री मनोज राव काकडे यांनी उपक्रम प्रमुख म्हणून रक्तदान शिबिराची धुरा सांभाळली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश गावडे, श्री रविराज फुगे,कु.हितेश पवार,कु.प्रांजल केळकर कु.सिध्दी गावडे,कु.भारत भालशंकर,कु.कण्व पवार, श्री हनुमंत भोईर,जयंत फाळके यांनी रक्तदान शिबिराचे आयोजनकामी विशेष प्रयत्न केले.चिंचवड वृत्तपत्र संघटनेचे श्री सुनील सुवसे व श्री सतिश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयच्या रक्तपेढीमार्फत रक्त संकलन केले गेले. यावेळी रक्तपेढीचे डाॅक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे उत्तम व्यवस्थापन करण्यात आले होते.