शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष तसेच बचत गट महासंघ सेल च्या शहर अध्यक्ष ज्योती ताई गोफणे यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा तसेच चिखली पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. सदर शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी पक्षाच्या महिला शहराध्यक्ष कविताताई अल्हाट, पोलीस उपनिरीक्षक, चिखली पोलीस ठाणे फडतरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर शिबिर मंगळवार दि. १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान, सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या दरम्यान सुरु राहणार असून सदर शिबिर ज्योतीताई गोफणे यांच्या जनसंपर्क कार्यालय आयोजित केले आहे.
यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजुभाऊ लोखंडे, शहर कार्याध्यक्ष फजल भाई शेख, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, उपाध्यक्ष आशा मराठे, मेधा पळशीकर, सपना कदम, विकास कृती समिती अध्यक्ष सुनील कदम, विकास गर्ग, सामाजिक कार्यकर्ते अमर शिंदे, राहुल चौधरी ,बबन भागडे ,वसंतराव चिखले, सविता खडतरे ,शैला सातपुते, पुष्पा झिरपे, अलका कुलट, प्रेमा शेट्टी, अर्चना पोंगशे, शोभा पाटील तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सदर शिबिर चिखली पोलीस ठाणे अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खुले आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्योतीताई गोफणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.