spot_img
spot_img
spot_img

BadeAchheLagteHain : भाग्यश्रीने उघडले मनातले गुपित-पण ऋषभ काय लपवत आहे?

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका- ‘बडे अच्छे लगते है- नया सीझन’ च्या नव्या प्रोमोमध्ये प्रेम, तळमळ आणि मोठा ट्विस्ट यावर भर देण्यात आला आहे. एका अत्यंत रोमहर्षक क्षणाला भाग्यश्री (शिवांगी जोशीने साकारलेले पात्र) अखेर ऋषभ (हर्षद चोप्रा) कडे तिच्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य कत्रित करते. पण पुढे जे घडते, ते अपेक्षेपेक्षा पूर्ण
वेगळे असते.

एक सुंदर प्रेमकथा सुरु होणार आहे, असे वाटते तेव्हाच प्रोमो एका आश्चर्यकारक वळणाचा संकेत देतो. भाग्यश्री अत्यंत प्रामाणिकपणे तिचे मन मोकळे करते. पण ऋषभ पूर्णपणे वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसतो. त्याच्या शांततेत आणखी काही दडलेलं आहे का? तो जे लपवत आहे, त्यामुळे सगळी परिस्थिती बदलू शकते का?

जसजशा भावना तीव्र होत जातात, तसे अनपेक्षित खुलासे समोर येत आहेत. बडे अच्छे लगते है- नया सीझन एका रोमहर्षक आणि भावनिक वळणासाठी पार्श्वभूमी तयार करत आहे. पण या सर्वात मोठा प्रश्न असा की, नशीबाचे खेळ सुरु होतात, तेव्हा प्रेम टिकू शकेल का?

पहा.. बडे अच्छे लगते है.. सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता, फक्त सोनी

एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि SonyLIV वर…

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!