शबनम न्यूज | प्रतिनिधी
बांगलादेशी युवतीला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून आमिषाने भारतात आणले त्यानंतर दलालांनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात डांबून वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावले. तिने नकार दिल्यानंतर खोलीत डांबून पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
एका सामाजिक संस्थेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर युवतीची सुटका केली. पोलिसांनी सहकारनगर पोलिसांच्या मदतीने दलालांसह कुंटणखाना मालकिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सामाजिक संस्थेने फिर्याद दिली. अभिषेक संथेबेन्नूर, तमन्ना शेख, रकीब खान यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.