शबनम न्यूज | प्रतिनिधी
तरुणाला कामावर जाण्यासाठी एका उशीर झाल्याने त्याने दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. मात्र, दुचाकीवरील हा प्रवास तरुणाचा अखेरचा ठरला. एका कंटेनरच्या धडकेत तरुण कंटेनरखाली चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. १४ जुलै) सकाळी पावणे सातच्या सुमारास खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे घडला.
गजानन बोळकेकर (२६, रा. बोलका, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य गायकवाड (२३, रा. येलवाडी, ता. खेड, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तंतरपाले (२४, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी विजय गजानन बोळकेकर हे चाकण एमआयडीसीतील एका कंपनीत मनुष्यबळ विकास (एचआर) विभागात नोकरी करत होते. सोमवारी ते पहिल्या शिफ्टसाठी कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. कामावर पोहोचण्यासाठी त्यांनी दुचाकीस्वाराकडे मागितली. यानंतर प्रवासादरम्यान हा अपघात झाला.