spot_img
spot_img
spot_img

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आदर्शरित्या नियोजन करणार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजित करताना विविध संस्थासंघटनानागरिक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल. हा कार्यक्रम उत्साहात व आदर्शरित्या साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहेअसे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे करण्यात येते. यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारीपोलीसमेट्रो प्रशासनपी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना प्रतिनिधीं यांचे समवेत आढावा बैठक काल आयोजित करण्यात आलेली होती,या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

    सदर बैठकीस माजी नगरसदस्य भगवान शिंदेकाळूराम पवार,माजी नगरसदस्या कमल घोलपउपायुक्त अण्णा बोदडेक्षेत्रीय अधिकारी अतुल पाटीलकार्यकारी अभियंता विजय वायकरडी.पी.पवारजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळजेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडेमेट्रो व्यवस्थापनाचे धनंजय कृष्णन,युवराज गावंडेउप अभियंता ए.ए.कुलकर्णीसामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे,संदीपान झोंबाडेनितीन घोलप,संजय ससाणे,युवराज दाखलेअरुण जोगदंडसुनिल भिसेनाना कसबेडी.पी.खंडाळे,सतिश भवाळसुनिल भिसेआशाताई शहाणेलहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते भाई विशाल जाधव,चंद्रकांत लोंढेसंजय धुतडमलउत्तम कांबळेयुवराज तिकटेबाबासाहेब पाटोळे,  गणेश अवघडेशिवाजी साळवेश्रीमंत गायकवाडशिवाजी चव्हाणसाहेबराव थोरातकैलास पाटोळेशिवाजी खडसेविठ्ठल वाघमारेतात्यासाहेब पाटोळे,उषा आल्हाटधिरज सकटसचिन कसबेनाना सगरसनी सकटकाशिनाथ आल्हाट,लक्ष्मण लोखंडेबाळासाहेब खंदारेमारूती सोनटक्केऋषिकेश गणगेनानासाहेब नरमिंगेअविनाश कांबीकरराजू जाधवशाहीर रामलिंग जाधवराम चौधरीनाना कांबळेअर्जुन नेटकेमंदार बागवविकास गायकांबळेमयुर गायकवाडसुरेश मिसाळशिवाजीराव साबळेरामदास कांबळेअण्णासाहेब कसबेभानुदास साळवे,  महादू आडागळेविष्णू कसबेशंकर खवळेआनंद कांबळेवैभव वायकरराजू आवळेसुनील खुडेसोमनाथ कांबळेगणेश अवघडेराम साठेउषा आल्हाटके.के. आल्हाटराकेश भिलारेस्वप्नील वाघमारे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे उपलेखापाल अनिल कु-हाडे,अभिजीत डोळस आदी उपस्थित होते.

 आजच्या बैठकीमध्ये विविध सूचना आल्या आहेत. कार्यक्रमाचे नियोजन करताना या सूचनांचा विचार महापालिका स्तरावर करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व उत्साहात साजरा करण्याचे नियोजन असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येतेयाबद्दल विविध संस्थासंघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून देण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरतात असे सांगितले.

बैठकीमध्ये प्राप्त सूचना….

विचार प्रबोधन पर्वानिमित्त उत्तम वक्त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावेउत्कृष्ट व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करावेशालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी निबंध,चित्रकला यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करावेशहराच्या स्वच्छतेविषयी प्रभावी भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूत म्हणजेच अवकारीका सिनेमा कलाकारांचा सन्मान करण्यात यावा,रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे,वृक्षारोपण मोहिम,आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजनपरिसंवाद,महिलासांठी कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच कार्यक्रमास मान्यवरांना निमंत्रित करावे यासह विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

बैठकीचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!