शबनम न्यूज | प्रतिनिधी
मँगलोर मिनरल कंपनीच्या जागेतून १३ हजार रुपयांचे लोखंडी रॉड चोरून नेणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील जाधववाडी येथे शनिवारी (दि. १२) रात्री दहा ते सोमवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली.
रितेश राजकुमार सोनवणे (वय २२, रा. माळवाडी, ता. मावळ, जि. पुणे) आणि कार्तिक निळु रंदिल (वय १९, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सतीश पांडुरंग भट (वय ५५, रा. वडगाव मावळ) यांनी रविवारी (दि. १३) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी १३ हजार रुपये किंमतीचे १४ किलो वजनाचे प्रत्येकी ९ लोखंडी रॉड चोरी करून नेले.