शबनम न्यूज | प्रतिनिधी
टोळक्याकडून एका महिलेला धमकावत तिच्या वडिलांवर कोयत्याने हल्ला, जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास निगडीच्या अण्णा भाऊ साठे वसाहतीतील घडली.
युवराज अडागळे, साहिल गुलाब शेख (वय २२, रा. पीएमसी कॉलनी, निगडी), चिराग ऊर्फ लल्ला चंडालिया, शंतनु सुनील म्हसुगडे (वय २४, रा. सावली बंगला, किवळे) व अविनाश भाऊ आव्हाड (वय २६, रा. कोतवालनगर, किवळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून साहिल शंतनु आणि अविनाश यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका २३ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फियादी यांचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत असलेल्या जुन्या वादातून फिर्यादी यांचे वडील विजय ढोणे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. तसेच दरवाजावर दगडफेक करून, कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत परिसरात कोयते व बांबू हवेत फिरवून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांची मैत्रिण सना शेख हिच्या दुचाकीसह परिसरातील इतर चार दुचाकी वाहने फोडून नुकसानही केले.