शबनम न्यूज | प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर काळी शाई टाकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.
पुरोगामी चळवळीतील नेते, व्याख्याते, लेखक म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. अक्कलकोट येथे एका सत्कारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या गाडीचेही नुकसान करण्यात आले तसेच त्यांचे कपडेही फाडण्यात आले.
अक्कलकोटमधील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड आले आहोते. यावेळी गाडीतून उतरल्याबरोबर काही जणांनी अचानक त्यांच्या डोक्यावर शाई ओतली. यानंतर प्रवीण गायकवाड यांनी गाडीकडे धाव घेत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गाडीतून खेचत बाहेर काढण्यात आले.