spot_img
spot_img
spot_img

उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून उज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!