शबनम न्यूज | प्रतिनिधी
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुम्मापट्टी, तालुका कर्जत जिल्हा रायगड या शाळेच्या वतीने माथेरान परिसर आणि शाळेच्या परिसरात 51 विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये कडूनिंब,आवळा, बेल, पारिजातक,अर्जुन,वड,पिंपळ इत्यादी झाडांचे वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बरोबर घेऊन केले. संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सहकारी प्रभाकर मेरूकर, वसंत दळवी,राजेंद्र फडतरे संध्या स्वामी सायली सुर्वे अरुण कळंबे पुष्पा संचेती सुनीता गायकवाड दिपाली मोरे मंजूश्री जंगम स्तुती सोमवंशी सिद्धी ढेरे या उपक्रमात सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुम्मापटीच्या मुख्याध्यापिका स्मिता पद्माकर म्हात्रे गीता प्रदीप पाटील सौ. छाया विजयसिंग चव्हाण सौ. वैशाली दत्तात्रेय ढोले आणि शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.