spot_img
spot_img
spot_img

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने भव्य वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा ग्राउंड झीरो, दत्तवाडी कमानी शेजारी चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री – महाराष्ट्र राज्य,आमदार- कोथरूड) यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून संपन्न झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती पुनित दादा जोशी (सरचिटणीस, पुणे भाजपा) व श्री पराग ठाकूर सर (अध्यक्ष,ढोल ताशा महासंघ) सामाजिक कार्यकर्ते अमोल शुक्ला व भरत अमदापुरे उपस्थित होते. कार्यक्रमास पुणे शहरातील विविध पथकांतील पदाधिकारी, वादक, तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाद्यपूजनासोबतच नवीन सराव सत्राचा प्रारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) – (संस्थापक, अध्यक्ष रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे हे गेली 9 वर्षांपसून गणेशोत्सव, पालख्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी या पूजन सोहळ्याने अधिकच जोमाने सुरू झाली आहे. वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्यातील रंगीत वेशभूषा, पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा नाद, आणि विविध सांस्कृतिक घटकांचे दर्शन याने उपस्थितांची मने जिंकली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!